राशीभविष्य मंगळवार १२ ऑक्टोबर २०२१

Horoscope
राशीभविष्य

मेष :- धावपळ होईल. एखाद्या व्यक्तीने विधान तुम्हाला विचारात पाडेल. निराश व्हाल. वस्तू सांभाळा.

वृषभ :- घरातील समस्या, नाराजी दूर करता येईल. धंद्यातील तणाव संपवेल. मोठे काम मिळवता येईल.

मिथुन :- विरोधक तुमच्या मागे तुमच्या विरोधात बोलतील. रागाच्या भरात एखादे काम बिघडु शकते. सौम्य बोला.

कर्क :- दुसर्‍यांची नाराजी, निराशा दूर करू शकाल. लोकप्रियता मिळेल. कला क्षेत्रात विशेष कार्य हातून होईल.

सिंह :- दिलेला शब्द पाळणे कठीण होऊ शकते. वाटाघाटीत गैरसमज होईल. दुसर्याचे मत ऐकावे लागेल.

कन्या :- व्यवहारीपणा, दृष्टीकोण फारच महत्वाचा ठरेल. ठरविलेले काम होईल. मोठी खरेदी कराल. परिचयात वाढ होईल.

तूळ :- धंद्यात सुधारणा होईल. थोरा-मोठ्यांचा सहवास मिळेल. जुना वाद संपवता येईल. काम होईल.

वृश्चिक :- प्रश्नाच्या दोन्ही बाजू समजून घेता येतील. विचारांना दिशा मिळेल. चूक सुधारण्याची आशा निर्माण होईल.

धनु :- महत्वाची वस्तू सांभाळा. मनाविरुद्ध काम करावे लागेल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. खंबीर रहा.

मकर :- आजच्या कामासाठी आज प्रयत्न करा. धंदा वाढेल. नव्या ओळखीचा उपयोग करून घेता येईल.

कुंभ :- तुमच्या श्रमाचे महत्व सर्वांच्या लक्षात येईल. अधिकार मिळेल. कोर्टाच्या कामात यश येईल.

मीन :- धंद्याचा व्याप वाढेल. वेळ व दोन हात कमी पडतील. कुणालाही दुखवू नका. प्रगती होईल.