राशीभविष्य मंगळवार २० जुलै २०२१

horoscope
राशीभविष्य

मेष ः- रेंगाळलेली कामे पटापट करून घ्या. मागिल येणे वसूल करा. धंद्यात वाढ होईल. सौम्य धोरण ठेवा.

वृषभ ः- सरकार दरबारची कामे होतील. आनंदी रहाल. धंदा वाढवण्यासाठी प्रयत्न यशस्वी होईल.

मिथुन ः- दुपारनंतर कामातील अडचणी कमी होऊ शकतात. प्रवासात सावध रहा. कायदा पालन करा.

कर्क ः- आजचे काम आजच करा. नको असलेली व्यक्ती संध्याकाळी भेटण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

सिंह ः- कर्जाच्या कामातील त्रुटी भरून काढता येईल. महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळवता येईल. राग आवरा.

कन्या ः- सकाळी कामे करून घ्या. दुपारनंतर अडचणी येऊ शकतात. धंद्यात हिशोब नीट करा.

तूळ ः- किरकोळ कारणाने तुमचा उत्साह कमी होऊ शकतो. वेळेला महत्त्व दिल्यास जास्त कामे होतील.

वृश्चिक ः- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. चर्चा यशस्वी होईल. शेअर्सचा अंदाज नीट घ्या.

धनु ः- वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. सर्वांचे सहाय्य मिळू शकेल. प्रतिष्ठा मिळेल.

मकर ः- तुमच्या मदतीने ज्यांना यश मिळाले असे लोक तुमचे आभार मानतील. मोठे आश्वासन मिळेल.

कुंभ ः- जिद्द कायम ठेवा. सकाळी क्षुल्लक कारणाने तणाव होऊ शकतो. प्रवासात अडथळे येतील.

मीन ः- महत्त्वाचे काम सकाळीच करा. चहानंतर दिरंगाई होईल. धंद्यासाठी धावपळ करावी लागेल.