राशीभविष्य: मंगळवार २६ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : आजचे काम आजच करा. वेगाने पूर्ण करता येईल. धंद्यात नफा होईल. कला क्षेत्रात मन रमेल.

वृषभ : महत्त्वाचे काम करा. रेंगाळत राहिलेले प्रश्न सोडवा. घरात मिळते-जुळते धोरण ठेवा.

मिथुन : नव्या विचाराने प्रगतीचा नवा मार्ग शोधाल. धंद्यात लक्ष द्या. मोठे स्वरूप देता येईल.

कर्क : प्रकृतीची काळजी घ्या. पोटाचा किरकोळ त्रास होऊ शकतो. अचानक पाहुणे येतील. काम वाढेल.

सिंह : प्रेमाला चालना मिळेल. मुले, जीवनसाथी यांच्याशी भविष्याविषयी चांगली चर्चा कराल.

कन्या : शेजारी वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. रस्त्याने चालताना वस्तू नीट सांभाळा.

तूळ : आप्तेष्ठ भेटतील. रागाचा पारा वाढवू नका. खरेदी-विक्रीचा प्रश्न सुटेल.

वृश्चिक : नोकरीत चांगला बदल करता येईल. घरगुती समस्या सोडवा. आळस करू नका.

धनु : अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने कामे होतील. जुने येणे वसूल करा. मदत मिळेल.

मकर : कोर्ट कचेरीचे अथवा तणावाचे प्रकरण लवकर मार्गी लावा. धंद्यात वाढ होईल.

कुंभ : तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करता येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मीन : जवळच्या व्यक्तीची काळजी वाटेल. मौल्यवान वस्तू खरेदी करताना सावध रहा.