मेष – समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाबाबतच्या सर्व चिंता दूर होतील. विरोधक कट करण्याचा प्रयत्न करतील.
वृषभ- आपले बोलणे थोडे सौम्य ठेवा. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. केस जिंकता येऊ शकते. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.
मिथुन – प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. तुमचा बौद्धिक कस लागू शकतो. आपल्या संसारासाठी चांगली खरेदी कराल.
कर्क – इतरांची चूक सुधारावी लागेल. नोकरीत तुमचा प्रभाव वाढेल. आपले विरोधक ओळखून ठेवा. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
सिंह – सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. इतरांना मदत करण्यात आपण आनंद मिळवाल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी.
कन्या – तुमच्यातील दिलदारपणा दिसून येईल. मानसिक चिंता बाजूला साराव्यात. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तींची गाठ पडेल.
तूळ – नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. व्यवसायातून चांगला नफा मिळवाल. कामांची गर्दी होईल. काटकसरीने वागावे लागेल.
वृश्चिक – महत्त्वाची कामे होतील. कल्पनाशक्तीचे कौतुक होईल. अती अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल. हातातील संधी सोडू नका.
धनु – जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मनातील उदासवाणे विचार काढून टाका. पैशांची नड भागली जाईल. रागाला आवर घाला.
मकर – मान-प्रतिष्ठा मिळणारी घटना घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका. कौटुंबिक खर्चाचे गणित नव्याने मांडावे.
कुंभ – तुमचा निर्णय योग्य असला तरी त्यावर टीका होऊ शकते. घरात तुमचे प्रभुत्व राहील. काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
मीन – ठरवलेले काम पूर्ण कराल. धंद्यात वाद वाढवू नका. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. आध्यात्मिक प्रगती साधता येईल.
Horoscope : मंगळवार 26 नोव्हेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -