मेष – नवीन ओळखीमुळे तुमच्या कार्याला दिशा मिळेल. व्यवसायात चांगली संधी मिळेल.
वृषभ – तुमच्या बोलण्या-वागण्यातील संयम तुम्हाला उपयुक्त ठरेल. धंदा वाढवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन – मनाची चंचलता होईल. स्पर्धेत चमकण्यासाठी जिद्द ठेवा. वाहनाशी खेळ करू नका.
कर्क – घरातील व्यक्तीबरोबर वाद संभवतो. कामात चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या.
सिंह – उत्साहवर्धक वातावरण राहील. धंद्यातील उणीव भरून काढता येईल.
कन्या – गोडी गुलाबीने वागल्यास कामे पटापट होतील. अरेरावी करण्याची गरज नाही. वस्तू सांभाळा.
तूळ – तुमच्या कार्याला नवे वळण मिळेल. नवीन मित्र परिवार मिळेल. नावलौकिक वाढेल.
वृश्चिक- स्वभाव चिडचिडा होईल. माणसे तोडू नका. कष्टासाठी आळस केल्यास नुकसान होईल.
धनु – संसारात सुखद वातावरण राहील. प्रेमाचा अनुभव मिळेल. धंदा वाढेल. मागे राहू नका.
मकर- प्रश्न नीट शांतपणे समजावून घ्या. विरोधक तुमची चूक शोधण्याचा प्रयत्न करतील.
कुंभ -विचारांना लिखाणाला चालना मिळेल. कल्पनाशक्तीचा विकास होईल. मित्र मिळेल.
मीन – कठीण प्रसंगावर कसा उपाय शोधावयाचा याचा अंदाज घेता येईल. जिद्दच यश देईल.