Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगलवार, १३ एप्रिल २०२१

राशीभविष्य : मंगलवार, १३ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- विरुद्धलिंगी व्यक्तीचा डाव ओळखा. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. धंद्यात मोठा फायदा होऊ शकतो.

वृषभ ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. कोर्टकेसमध्ये नम्रतेने बोला. समस्या वाढणार नाही.

- Advertisement -

मिथुन ः- दुसर्‍यांच्या रागाचा तुम्हाला त्रास होईल. प्रेमाच्या व्यक्तीला सांभाळून घ्या. स्पर्धेत चमकाल.

कर्क ः- आजचे काम आजच करणे याला तत्परता म्हणतात. नावलौकिक मिळेल. आवडते पदार्थ मिळतील.

- Advertisement -

सिंह ः- क्षुल्लक गोष्टींच्या बोलण्याचा मनावर ताण येईल. दडपण वाढेल. कामाचा व्याप वाढेल.

कन्या ः- धंद्यात वाढ होईल. वरिष्ठांबरोबर गोड बोला. तुमचा महत्त्वाचा प्रश्न सोडवा.

तूळ ः- तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वाहन जपून चालवा. कला-क्रीडा-साहित्यात चमकाल.

वृश्चिक ः- विचारांना दिशा मिळेल. मोठ्या लोकांची मदत धंद्यात घेता येईल. नवीन ओळख होईल.

धनु ः- मुलांची प्रगती पाहून सुख वाटेल. नवीन खरेदी कराल. मोठे लोक मदत करतील.

मकर ः-आजचे काम उद्यावर टाकू नका. मान-प्रतिष्ठा मिळेल. कठीण काम करून घेता येईल.

कुंभ ः- तुमच्या कार्याला योग्य दिशा मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. आवडते काम करण्यात मन रमेल.

मीन ः- जुना वाद मिटवता येईल. नवीन धंदा मिळेल. धंद्यात अंदाज बरोबर येईल. प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisement -