Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार २९ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : मंगळवार २९ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : विरोधकांचे कट कारस्थान तुमच्या लक्षात येईल. चतुराईने वागा. प्रतिष्ठा सांभाळता येईल. नवा विचार मिळेल.

- Advertisement -

वृषभ : नोकरीत कायद्याच्या बंधनात राहून काम करा. पुढे जाता येईल. नवीन ओळख होईल. धंद्यात काम मिळेल.

मिथुन : खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल.

- Advertisement -

कर्क : आत्मविश्वास ठेवा; पण अहंकार मात्र ठेवू नका. तुम्ही परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्या. यश मिळेल.

सिंह : धंद्यात वाढ होईल. खर्च वाढेल. वरिष्ठ नोकरीत तुमची वरच्या पदासाठी शिफारस करतील.

कन्या : मनाची द्विधा अवस्था होऊ शकते. घरातील व्यक्ती मदत करतील. तुम्ही अभ्यासपूर्ण निर्णय घ्या. धंदा वाढेल.

तूळ : क्षुल्लक कारणाने तुम्ही नाराज व्हाल. रागावर ताबा ठेवा. दुखापत होणार नाही याची काळजी काम करताना घ्या.

वृश्चिक : योजनांना गती मिळेल. आप्तेष्ठ, मित्र मदत करतील. धंद्यात मोठे काम मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल.

धनु : ठरविलेला कार्यक्रम व्यवस्थितपणे पूर्ण करा. थकबाकी वसूल करा. धंद्यात सुधारणा होईल. मदत मिळेल.

मकर : अपयशाने नाराज न होता पुढे जाता येईल. कमीपणा वाटून न घेता प्रयत्न करत रहा. नोकरी टिकवा.

कुंभ : शेजारी तुमच्या सुखाची तुलना स्वतःबरोबर करेल. नोकरीत काम वाढेल. वरिष्ठांना ओळखून मग बोला.

मीन : वाहन जपून चालवा. व्यवसायात तुमची प्रगती होईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. प्रतिष्ठा मिळेल.

- Advertisment -