मेष : प्रवासात वाहनाचा खर्च निर्माण होऊ शकतो. वेळेवर तुम्ही औषधपाणी घ्या. राग वाढवू नका. धंद्यात फायदा होईल.
वृषभ : संसारात कामे वाढतील. तुम्हाला संयमाने प्रश्न सोडवता येईल. नोकरीत वरिष्ठ तुम्हाला समजून घेतील.
मिथुन : विरोधकांना गप्प करता येईल. क्षुल्लक कारणाने घरात तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. शेजारी त्रस्त करतील.
कर्क : तुमचे बोलणे सत्य असेल. त्यांचा गाजावाजा केला जाईल. वरिष्ठांना दुखवण्याचा विचार मात्र करू नका.
सिंह : अपरिचित व्यक्ती बरोबर व्यवहार करताना काळजी घ्या. कोणतेही गुपित उघड करू नका. चांगले अन्न खा.
कन्या : घर, जमिनी संबंधी काम करून घेता येईल. नोकरीत तुमचा मुद्दा योग्य वेळी मांडा, प्रभावी ठरेल.
तूळ : धंद्यात फायदा होईल. नुकसान भरून काढता येईल. नवीन कामात वरिष्ठांची मदत मिळेल. दैवी चमत्कार होईल.
वृश्चिक : तुमच्या मनावरील ताण कमी होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल.
धनु : रागावर ताबा ठेवा. काम करताना घाई करू नका. वरिष्ठांचा दबाव राहील. तुम्ही कामात चूक करू नका.
मकर : महत्त्वाचे काम आज करून घ्या. नम्रता ठेवा. धंद्यात काम मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल.
कुंभ : व्यवसायात भावनेला महत्त्व नसते. फायदा होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. अध्यात्मात एकाग्रता होईल.
मीन : प्रगतीचा नवा मार्ग धंद्यात मिळेल. मोठे कंत्राट मिळेल. पदाधिकार मिळेल. नोकरी मिळेल.