राशीभविष्य: मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : दौर्‍यात यश मिळेल. मिळते-जुळते धोरण फार प्रभावी ठरेल. लोकांकडून प्रेम व आर्थिक सहाय्य मिळेल.

वृषभ : महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करा. कला क्षेत्रात जास्त मेहनत घ्यावी लागेल. नवीन काम मिळेल.

मिथुन : प्रवासात घाई करू नये. वरिष्ठांचा मान ठेवा. घरातील वृद्ध व्यक्तींविषयी चिंता वाटेल.

कर्क : आजचे काम उद्यावर टाकू नका. यशस्वी दिवस. स्पर्धेत चमकाल. ठरविलेले काम कराल.

सिंह : विरोध मोडून काढणे सोपे नाही. प्रयत्न नेहमीच करावयाचे असतात. जवळच्या माणसाला खूश ठेवा.

कन्या : आजचे काम आजच करा. भेटीत, चर्चेत यश मिळेल. मोठ्या लोकांचा परिचय होईल.

तूळ : आर्थिक लाभ होईल. धंद्यात वाढ होईल. स्पर्धेत कठीण प्रसंग होईल. मैत्रीतील गैरसमज दूर करा.

वृश्चिक : लोकांच्या प्रश्नावर विचार केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. स्पर्धेत यश मिळेल. चांगले अन्न खा.

धनु : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. रागावर ताबा ठेवा. तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करा. मेहनत घ्या.

मकर : तुमचा विश्वास व उत्साह पाहून सर्वांना हिंमत येईल. तुमचे डावपेच यशस्वी होतील.

कुंभ : अडचणी येतील. संताप करू नका. प्रवासात घाई करू नका. वरिष्ठांना खूश ठेवा.

मीन : आजचे काम उद्यासाठी ठेऊ नका. धंद्यात फायदा होईल. घर, वाहन घेण्याचा विचार कराल.