राशीभविष्य: मंगळवार ,११ जानेवारी २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमच्या क्षेत्रात मिळणारी प्रगतीची संधी सोडू नका. थकबाकी वसूल करा. नवीन मित्र-परिवार तयार होईल.

वृषभ :- धंद्यात मोठे काम मिळेल. फायदा करून घेता येईल. स्पर्धेत चमकाल. ताण-तणाव कमी होईल.

मिथुन :- अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने तणाव हलका होईल. गोड बोलणारी व्यक्ती ओळखून ठेवा.

कर्क :- जुना वाद निर्माण होईल. नोकरीत काम वाढेल. चूक होणार नाही याची काळजी घ्या.

सिंह :- कामाची गती वाढेल. जुने मित्र मदत मागतील. कामात यश मिळेल. प्रवास सुखकर होईल.

कन्या :- ठरविलेले काम पूर्ण होईल. पाहुण्यांचे स्वागत कराल. विरोध मोडून काढता येईल. स्पर्धा जिंकाल.

तूळ :- इतरांच्या मतानुसार तुम्हाला काम करावे लागेल. कामाचा ताण हलका झाला तरी थकवा वाटेल.

वृश्चिक :- तटस्थ राहून प्रसंगाचे अवलोकन करा. प्रवासात घाई करू नका. वादाने वादच वाढत असतो.

धनु :- नातलगांची भेट होईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत यशस्वी व्हाल. मुले आनंद देतील.

मकर :- इतरांना न दुखावता काम करा. प्रवासात घाई नको. विरोधक दबाव निर्माण करतील.

कुंभ :- स्पष्टपणे तुम्ही तुमचे विचार मांडू शकाल. वेळ, प्रसंगानुसार तुम्हाला प्रश्न सोडवावा लागेल.

मीन :- महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. मौज-मजा कराल. खाण्याची हौस पूर्ण कराल. धंदा मिळेल.