राशीभविष्य : मंगळवार, १९ जानेवारी २०२१

राशीभविष्य

मेष : अडचणीतून मार्ग शोधता येईल. जवळचे लोक मदत करतील. धंद्यात जम बसवता येईल. वसुली करा. नवीन ओळख होईल.

वृषभ : नोकरीत वादाचा प्रसंग निर्माण होईल. नम्रपणे तुमचा मुद्दा मांडा. कोर्टाच्या कामात सावध रहा. नवे काम मिळवा.

मिथुन : धंद्यातील अडचणी दूर करता येईल. नोकरांना कमी लेखू नका. घरातील वृद्ध व्यक्तीबद्दल चिंता कराल.

कर्क : अचानक कामात बदल करावा लागेल. खर्च वाढेल. मैत्रीत दुरावा येऊ शकतो. घरातील कामे वाढतील.

सिंह : वरिष्ठांबद्दल त्यांच्या पाठीमागे चर्चा करू नका. नवीन परिचय होईल. कला-क्रीडा क्षेत्रात रमून जाल.

कन्या : नको असलेली व्यक्ती भेटेल. तुमचा वेळ खर्च होईल. शेजारी मदत मागतील. नोकरीत वरिष्ठांना मदत कराल.

तूळ : धावपळ होईल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. धंद्यात वाढ होईल. पाहुणे येतील. खरेदी कराल.

वृश्चिक : धंदा कसा वाढेल याचा विचार करा. स्पर्धा जिंकाल. जुने मित्र भेटतील. राजकारणात डावपेच यशस्वी होईल.

धनु : वाहन जपून चालवा. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल, धंद्यात मोठे काम मिळेल. वसुली करा. मित्र भेटतील.

मकर : तुमचा अंदाज चुकेल. आरोप येण्याची शक्यता आहे. पैसा नीट खर्च करा. अहंकाराने वागू नका. मैत्री टिकवा.

कुंभ : तुमच्या कामाला गती मिळेल. कल्पना कृतीत उतरवता येईल. प्रसिद्धी मिळवण्यासाठी विलंब होऊ शकतो.

मीन : धंद्यात फायदा होईल. भेटवस्तू खरेदी करण्यात पैसा खर्च होईल. घर, वाहन खरेदीचा विचार कराल.