घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार ३० जानेवारी २०२४

राशीभविष्य : मंगळवार ३० जानेवारी २०२४

Subscribe

मेष – वैर वाढवू नका. उद्याची वाट पहा. समस्या सोडवता येईल. तुमची मैत्री करण्याची एखादी नवी पद्धत शोधा.
वृषभ – घरातील व्यक्ती खूश होतील. मान-प्रतिष्ठा मिळेल. आवडते पदार्थ मिळतील. कला क्षेत्रात रमाल.
मिथुन – प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. घरातील व्यक्तीची नाराजी दूर करता येईल. धंद्यात वाढ होईल.
कर्क – राहिलेले काम करता येईल. अपमानाकडे लक्ष न देता कार्य करा. रागावर ताबा ठेवा. यश मिळेल.
सिंह – तुमचा प्रभाव वाढेल. प्रेमाची माणसे भेटतील. बहुमतांचा फायदा घेता येईल. स्पर्धा जिंकाल.
कन्या – तुमच्यावर विश्वास ठेवणारी माणसे मदत करतील. स्पर्धेत चमकाल. प्रसिद्धी व पैसा मिळेल.
तूळ – कामात चूक होऊ शकते. रागावर ताबा ठेवा. प्रेमात वाद होईल. प्रकृतीची काळजी घ्या. मित्रांचे सहाय्य मिळेल.
वृश्चिक – आजचे काम आजच करा. आळस करू नका. नवे मित्र जोडता येतील. स्पर्धेत कष्ट घ्यावे लागतील.
धनु – कामाच्या ठिकाणी विश्वास ठेवावा लागेल. वाद मिटवता येईल. क्षुल्लक व्यक्ती तुम्हाला नाउमेद करू शकते.
मकर – तुमची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी प्रयत्न करता येतील. धंद्यात नवे काम मिळेल. शत्रूला नमवता येईल.
कुंभ – घरात तुमचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. प्रेमात गैरसमज होईल. पोटाची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा.
मीन – नोकरीत महत्त्वाचे पद वरिष्ठ तुम्हाला देतील. स्पर्धेत चमकाल. नवा विषय शिकण्यास मिळेल. धंद्यात यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -