घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य: मंगळवार, ०१ मार्च २०२२

राशीभविष्य: मंगळवार, ०१ मार्च २०२२

Subscribe

मेष :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मैत्री दृढ होईल. धंदा मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल.

वृषभ :- कठीण प्रसंगावर मात करण्याची जिद्द येईल. भावना व व्यवहार यांचा नीट मेळ घाला. धंदा मिळेल.

- Advertisement -

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. आवडते पदार्थ मिळतील.

कर्क :- तुमचा विचार इतरांना पटवून देताना सौम्य शब्द वापरा. राग केल्यास काम बिघडू शकते.

- Advertisement -

सिंह :- ठरविलेले काम आजच करा. आळस करू नका. प्रतिष्ठित व्यक्तींचा परिचय फायदेशीर ठरेल.

कन्या :- तुमच्या विचारांना चांगला प्रतिसाद मिळेल. महत्त्वाची चर्चा सफल झाल्याने उत्साह वाढेल.

तूळ :- तुमच्यावर प्रेम करणारी माणसे तुमचे मत ऐकून घेतील. अरेरावी करण्याची गरज नाही. धंदा मिळेल.

वृश्चिक :- मनावर कामाचे दडपण येईल. धावपळ करावी लागेल. विरोधकांना कमी समजू नका. नम्रपणेच बोला.

धनु :- नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी मैत्री वाढेल. महत्त्वाचे काम आज करून घ्या. धावपळ होईल.

मकर :- मनातील गुपित भलत्याच माणसाजवळ उघड करू नका. धंद्यात सहनशीलता व जिद्द ठेवा.

कुंभ :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. भेट होईल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

मीन :- स्वतःचे महत्त्व टिकवून ठेवता येईल. धंदा वाढेल. प्रसिद्धी मिळेल. संधीचा फायदा चांगल्या कामासाठी करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -