घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : मंगळवार,०४ मे एप्रिल २०२१

राशीभविष्य : मंगळवार,०४ मे एप्रिल २०२१

Subscribe

मेष ः- सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवता येईल. तुमची प्रतिष्ठा नव्याने तयार करावी लागेल. नम्रपणे वागा.

वृषभ ः- वरिष्ठांच्या नाराजीचे कारण शोधा. खर्च वाढेल. प्रवासात सावधपणे वाहन चालवा. जिद्द ठेवा.

- Advertisement -

मिथुन ः- अडचणीतून मार्ग काढा. मोठ्या लोकांची मदत मिळेल. तुमची प्रगती सर्वांच्या इच्छेनुसार होईल.

कर्क ः- आवडत्या विषयात रमून जाल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

- Advertisement -

सिंह ः- दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत जबाबदारी वाढेल. स्पर्धेत प्रगतीची संधी मिळेल.

कन्या ः- वडिलधार्‍या व्यक्तींची काळजी वाटेल. प्रेमाने समस्या सोडवा. मित्राची मदत घेता येईल.

तूळ ः- आनंदी रहाल. मौज-मजेत वेळ घालवाल. ठरविलेले कठीण काम सुद्धा पूर्ण करता येईल.

वृश्चिक ः- कामात अडचणी येतील. चिडचिड करू नका. प्रवासात सावध रहा. खर्च फुकट जाण्याची शक्यता.

धनु ः- मुलांचा सहवास आनंद देईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. धंद्यात लक्ष द्या. यश मिळेल.

मकर ः- क्षुल्लक कामात राग वाढवू नका. थोरा मोठ्यांचे सहकार्य मिळेल. स्पर्धेत तुमचा नंबर लागेल.

कुंभ ः- स्वतःच्या हिमतीवर प्रश्न सोडवाल. तुमचे स्थान पक्के होईल. प्रेमात यश जिंकाल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

मीन ः- धंद्यातील समस्या कमी होईल. नोकरवर्ग नवीन मिळेल. स्वतःच लक्ष द्या. एकच काम नीटपणे करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -