मेष : सामाजिक कार्याला प्रेरणा देणारी घटना घडेल. तुमची छोटीशी चूक मोठी करून दाखवण्याचा प्रयत्न होईल. नवीन ओळख होईल.
वृषभ : धंद्यात नवीन काम मिळेल. नोकरांच्यावर नजर ठेवा. कठोर बोलणे टाळा. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल. खर्चावर ताबा ठेवा.
मिथुन : विरोधकांना चातुर्याने सांभाळावे लागेल. स्पर्धेत पुढे जाता येईल. वाहनाचा वेग कमी ठेवा. कामात क्षुल्लक अडथळे येतील.
कर्क : घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृती सुधारेल. कला-क्रीडा स्पर्धेत नावलौकिक मिळेल. नोकरीतील तणाव कमी होईल.
सिंह : चौफेर सावध रहा. अडथळ्यातून मार्ग शोधवा लागेल. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. राजकारणात बदनामी होईल.
कन्या : महत्त्वाचे काम करून घेता येईल. व्यसनाने मानसिक तणाव होईल. विरुद्धलिंगीपासून दूर रहा. धंद्यात लक्ष द्या.
तूळ : कामातील किरकोळ कारणाने तणाव येईल. धंद्यात फायदा होईल. वसुली होईल. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.
वृश्चिक : वरिष्ठांच्या मदतीने कठीण काम करून घेता येईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. जवळच्या लोकांना दुखवू नका. नोकरी मिळेल.
धनु : धंद्यात फायदा होणारे मोेठे काम मिळेल. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.
मकर : ठरविलेले काम वेळेत पूर्ण कराल. नव्या योजना समाजासाठी तयार करता येतील. कोर्टाच्या कामात मोठे यश मिळेल.
कुंभ : विचारांना चालना मिळेल. अचानक पाहुणे आल्याने तुम्हाला कामात बदल करावा लागेल. मोठ्या लोकांची ओळख होईल.
मीन : अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने अडलेले काम करून घेता येईल. प्रेमाला चालना मिळेल. स्पर्धेत प्रगती कराल.