राशीभविष्य: मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१

After 30 years Shani will enter in Aquarius these 4 zodiac get progress in career
३० वर्षांनंतर शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार; 'या' ४ राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचा योग

 

मेष :- संततीबरोबर योग्य ती चर्चा करता येईल. एकमताने मोठा निर्णय घेता येईल. रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावता येईल.

वृषभ :- जुने विचार विसरून नव्या दिशेकडे चला. प्रयत्नानेच स्वतः काही मिळवावे लागते. आळस नको.

मिथुन :- उत्साहाच्या भरात इतरांना कठीण वाटणारे काम तुम्ही पूर्ण करू शकाल. वरिष्ठ खूश होतील. आर्थिक लाभ होईल.

कर्क :- व्यवसायातील तणाव कमी करता येईल. वरिष्ठांच्या विरोधात जाण्याचीही वेळ नाही. प्रयत्नाने यश मिळेल.

सिंह :- मनाची उत्सुकता होईल. विचारांना दिशा मिळेल. समाधानाने दिवसाची कामे होतील. धंदा वाढेल.

कन्या :- दुसर्‍याला दोष देण्यात वेळ फुकट जाईल. व्यसन वाढण्याची शक्यता आहे. स्वतःचा तोल व बोल सांभाळा.

तूळ :- विचारांची देवाण-घेवाण करता येईल. खूशखबर मिळेल. बर्‍याच दिवसांपासून वाट पहात असलेले काम मार्गी लागेल.

वृश्चिक :- मनावर निष्कारण दडपण येईल. अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. दिशा मिळेल.

धनु :- घरगुती प्रश्न सुटेल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. गैरसमज दूर करा.

मकर :- अपेक्षित व्यक्तीची भेट झाल्याने प्रश्न सुटेल. तुमची घोडदौड वाढेल. आत्मविश्वास नियंत्रित असू द्या. संयम सोडू नका.

कुंभ :- घरगुती चिंता कमी होईल. संतती संबंधी प्रश्न सुटेल. धंदा वाढेल. प्रवास होईल.

मीन :- विश्वासघात संभवतो. अपमानास्पद शब्द सहन करावे लागतील. वाहन जपून चालवा. प्रकृती सांभाळा.