राशीभविष्य: बुधवार ०१ मार्च २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- तुम्ही ठरविलेल्या कामात जिद्दीने यश मिळवता येईल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धेत जिंकाल.

वृषभ ः- कोर्टाच्या कामात प्रगती होईल. केस संपवण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीत चांगला बदल करू शकाल.

मिथुन ः- दिवसाच्या दुसर्‍या प्रहरात महत्त्वाचे काम करून घेता येईल. वाहन जपून चालवा. खाण्याची काळजी घ्या.

कर्क ः- काळजी करण्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न सोडवा. डोके शांत ठेवा. कायदा मोडू नका. वाद वाढेल.

सिंह ः- आजच्या कामात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. भेट घेता येईल. चर्चा सफल होईल.

कन्या ः- संधी पाहून तुम्हाला योग्य तो निर्णय घेता येईल. जुना मुद्दा पकडून विरोधाला मोडून काढा.

तूळ ः- सकाळी मन अस्थिर होईल. जेवणानंतर प्रश्न कसा सोडवायचा ते समजेल. वाहन जपून चालवा.

वृश्चिक ः- सकाळचा उत्साह दुपारी टिकणे कठीण आहे. विरोध होईल. तुम्ही तयारी ठेवा.

धनु ः- दुपारनंतर तुमचे काम होईल. खाण्याची काळजी घ्या. दगदग वाढेल. मोठे काम करून घ्या.

मकर ः- तुमच्यावर भलताच आरोप होऊ शकतो. तुम्ही तुमचे काम करत रहा. लोक तुमची स्तुती करतील.

कुंभ ः- योग्य मुद्यावर चर्चा करता येईल. शत्रूला शह देण्यासाठी संयमाने मार्ग निवडावा लागतो.

मीन ः- वाहन जपून चालवा. प्रेमाला चालना मिळेल. धंद्यात फायदा होईल. वाद नको. मुद्दा मांडा.