राशीभविष्य: बुधवार ०३ ऑगस्ट २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : धंद्यातील कामे करून घ्या. नोकरीत वरिष्ठांना तुमची समस्या समजून सांगा. कला क्षेत्रात चमकाल.

वृषभ : प्रगतीची चांगली संधी धंद्यात मिळेल. नोकरीतील समस्या वाढू देऊ नका. मिळून-मिसळून रहा.

मिथुन ः मुलांच्या, जीवनसाथीच्या प्रगतीने तुम्ही खूश व्हाल. नोकरीत वरिष्ठांना खूश करता येईल.

कर्क : अडचणी येतील. त्यामुळे मन अस्थिर होईल. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. वाद होईल.

सिंह : ठरविलेले काम पूर्ण करता येईल. स्पर्धेत चमकाल. नवीन ओळख वाढेल. वैयक्तिक प्रश्न सोडवा.

कन्या ः आत्मविश्वासाने एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. तुमचे कौतुक होईल. कला क्षेत्रात प्रगती होईल.

तूळ : गैरसमज दूर करता येईल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नोकरीच्या प्रयत्नाला यश मिळेल.

वृश्चिक : विरोधक तुम्हाला जेरीस आणू शकतात. लोकप्रियता कमी होईल. धंद्यात खर्च होईल.

धनु : घरगुती वातावरण आनंदी राहील. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल. जुन्या आठवणी येतील.

मकर : वादाचा विषय चर्चा करताना निघू शकतो. प्रेमाने प्रेम वाढते. विरोधाने वैर वाढते.

कुंभ : महत्त्वाचे काम करून घ्या. सर्वांचे सहाय्य मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल.

मीन : तुमचा उत्साह वाढेल. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीला नीट पारखून घ्या व नंतरच व्यवहार करा.