राशीभविष्य : बुधवार ०३ मे २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष – निरुत्साही वाटेल. क्षुल्लक वाद संभवतो. महत्वाच्या वस्तू वेळेवर सापडणे कठीण होईल.

वृषभ – जुने मित्र भेटतील. राजकीय क्षेत्रातील चर्चा सफल होईल. कला क्षेत्रात प्रगतीची संधी. आर्थिक लाभ संभवतो.

मिथुन – व्यवसायात व नोकरीत उत्साहवर्धक वातावरण राहील. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. प्रेमात सावध रहा.

कर्क – द्विधा विचारांनी ग्रासले जाल. घरगुती तणाव कमी होईल. स्पर्धेसाठी जिद्द ठेवावी लागेल.

सिंहः- मान-सन्मान मिळविण्यासाठी भांडण केल्यास गैरसमज वाढेल. वाहन जपून चालवा. मूल्यवान वस्तू सांभाळा.

कन्या – कुटुंबाबरोबर वेळ मजेत जाईल. अधिष्ठांच्या भेटीने आनंद मिळेल. धंद्याची दिशा मिळेल.

तूळ – व्यवसायातील महत्वाचा धागा हाती लागेल. विचारांची देवाण-घेवाण करताना शब्द जपून वापरा. संततीचा आधार वाटेल.

वृश्चिकः- आत्मविश्वासाने एखादा निर्णय घेता येईल. प्रतिष्ठा मिळेल. मित्र-परिवार वाढेल.

धनु – धावपळ व दगदग होईल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. वाहन जपून चालवा. लाभ होईल.

मकर – जीवनसाथीचा आधार व ध्येय महत्वाचे वाटेल. नव्या विचारांचा उपयोग करून घेण्यात यशस्वी व्हाल.

कुंभः – गैरसमज व तणाव संभवतो. प्रतिष्ठेवर टीका केली जाईल. तुमचा मोठेपणा इतरांना सहन होणार नाही.

मीन – प्रवासाचा बेत ठरवाल. व्यवसायात सुधारणा होईल. शेजारी मदत करेल. प्रतिष्ठा टिकवता येईल.