राशीभविष्य बुधवार ०४ ऑगस्ट २०२१

राशीभविष्य

मेष :- तुमच्या विचारांशी सहमत होणार्‍या लोकांची संख्या वाढेल. जीवनसाथीला तुमचे कौतुक वाटेल.

वृषभ :- आक्रमक विधान करण्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नियमांचे पालन करावे लागेल.

मिथुनः- मन स्थिर होईल. योग्य दिशेने प्रगती करता येईल. कोडे सुटल्यामुळे तणाव कमी होईल.

कर्क :- मनात अविचारांना थारा देऊ नका. कार्य करण्याकडे लक्ष द्या. सहजपणे वागा व बोला.

सिंह :- तुमच्या मूळच्या स्वभावानुसार तुम्ही वागा. मित्र-परिवारात वाढ होईल. निर्णय घेण्यात यश मिळेल.

कन्या :- तुमच्या कामाचा ठसा उमटवता येईल. जुणे येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवा.

तूळः- विचारांना योग्य दिशा मिळेल. वरिष्ठ व्यक्ती तुमचा सल्ला घेण्यास येतील. लाभ होईल. कलेत प्रगती होईल.

वृश्चिकः- विविध विचारांचा गोंधळ झाल्याने वेळ फुकट जाऊ शकतो. महत्त्वाचे तेच काम प्रथम करून घ्या.

धनु :- आशादायक परिस्थिती निर्माण होईल. कला-क्रीडा क्षेत्रात यश. नोकरीत संबंध सुधारता येईल.

मकर :- विरोधक मैत्री करण्यासाठी पुढे येतील. अहंकार न ठेवता बोलणी करण्यास विसरू नका.

कुंभ :- उत्साह वाढेल. मित्र परिवारासमवेत मौज-मस्ती होईल. धंद्यात वाढ होईल.

मीन :- धनलाभ होईल. उधारी वसूल करा. दगदग होईल. कामे वाढतील. वेळ कमी पडेल.