राशीभविष्य: बुधवार ०६ जुलै २०२२

horoscope daily horoscope horoscope Tuesday 11 july 2022
राशीभविष्य

मेष : धंद्यात सावध रहा. लक्ष द्या. फायदा होईल. व्यवहाराच्या ठिकाणी भावना आणू नका. राग आवरा.

वृषभ : राहून गेलेले काम पूर्ण करता येईल. स्पर्धेत प्रगती होईल. धंदा वाढवता येईल.

मिथुन : अडथळे येतील. राग आवरा. जिद्दीने काम पूर्ण करा. मुलांच्या बरोबर मतभेद होईल.

कर्क : महत्त्वाची भूमिका निभावता येईल. निर्णय घ्याल. कल्पनाशक्तीची चांगली साथ मिळेल.

सिंह : धंद्यात-नोकरीत तुमच्या अंदाजाने कामे पटापट करता येतील. कोर्टात यश मिळेल.

कन्या : तुमचा उत्साह महत्त्वाचा ठरेल. नवीन ओळख होईल. कला क्षेत्रात चमकाल.

तूळ : सकाळीच महत्त्वाचा निर्णय घेता येईल. संध्याकाळी कामात अडचणी येतील. दडपण येईल.

वृश्चिक : घरातील व्यक्तींना खूश कराल. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा.

धनु : अडचणी आल्या तरी युक्तीने पुढे जाता येईल. पोटाचा त्रास होऊ शकतो. पाहुणे येतील.

मकर : महत्त्वाचे, मोठे काम करून घ्या. घरातील व्यक्तींची मदत होईल. प्रतिष्ठा मिळेल.

कुंभ : कामाची जबाबदारी तुमच्यावर टाकली जाईल. दुरावा संभवतो. महत्त्वाच्या वस्तू, कागद सांभाळा.

मीन : नवीन ओळख होईल. विवाह जमवण्यात यश मिळेल. जमिनीचे काम होईल.