घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार ०८ नोव्हेंबर २०२३

राशीभविष्य : बुधवार ०८ नोव्हेंबर २०२३

Subscribe

मेष : किरकोळ कारणाने तुमचे काम रेंगाळण्याची शक्यता आहे. प्रेमाने तुम्ही तुमचा विचार पटवून द्या. नवे मित्र होतील.

वृषभ : धंद्यातील वाद मिटवता येईल. अचानक पाहुणे आल्याने खर्च वाढेल. महत्वाची वस्तू विसरू नका. वाहन हळू चालवा.

- Advertisement -

मिथुन : धंद्यात वाढ होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल. ओळख वाढेल.

कर्क : मनावरील ताण हलका करण्याचा मार्ग मिळेल. आप्तेष्ठ मदत करतील. घरातील आजारी व्यक्तीची काळजी वाटेल.

- Advertisement -

सिंह : गोड बोलून विरोध मैत्री करण्यास येतील. तुमचा मनातील गुपित काढण्याचा प्रयत्न करतील.

कन्या : विचारांना चालना मिळेल. उतावळेपणा न करता काम करावे लागेल. अडचणीतून मार्गक्रमण करावे लागेल.

तूळ : महत्वाचे काम करता येईल. कोर्टकेस लवकर संपवा. धंद्यात वाढ होईल. येणे वसूल करा. स्पर्धा जिंकाल.

वृश्चिक : धंद्यात मिळालेले आश्वासन समोरची व्यक्ती पूर्ण करेल. राजकारणात तुमच्या नावाने शंख केला जाईल.

धनु : धावपळ झाल्याने किरकोळ थकवा वाटेल. वाहन हळू चालवा. प्रवासात वस्तू सांभाळा. छोटीशी दुखापत होईल.

मकर : घरातील व्यक्तींना खूश कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धंद्यात वाढ होईल. प्रश्न रेंगाळत ठेवू नका.

कुंभ : तुमच्यावर आरोप टाकला जाईल. इतरांनी केलेल्या चुका सुधारण्याचे काम तुम्हाला करावे लागेल.

मीन : आज ठरविलेले काम जिद्दीने पूर्ण करता येईल. धोरण सौम्य ठेवा. मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा. वाद वाढवू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -