राशीभविष्य: बुधवार १० ऑगस्ट २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : भावनेच्या आहारी जाऊ नका. धंद्यात काम वाढेल. व्यवहारात कर्तव्यदक्ष रहा. प्रवासात अडचण येऊ शकते.

वृषभ : घरातील लोकांची मर्जी राखता येईल. नोकरीत कामाची गर्दी होईल. जुने लोक भेटतील.

मिथुन ः शेजारी तुम्हाला मदत मागेल. कला क्षेत्रात सावधपणे मैत्री वाढवा. खर्च अनाठाई होऊ शकतो.

कर्क : आजचे काम आजच करा. विचारांना चालना मिळेल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल.

सिंह : तुमच्या कार्याला दिशा देण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. नोकरीत मोहाचे क्षण येतील.

कन्या ः कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. धंद्यात नवा फंडा शोधाल. थकबाकी वसूल करा.

तूळ : धंद्यात वाढ होईल. आर्थिक गुंतवणूक योग्य प्रकारे करा. प्रेमाला चालना मिळेल.

वृश्चिक : तुमचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न होईल. लोकप्रियता कमी होणार नाही. स्पर्धेत जिद्द ठेवा.

धनु : रागावर ताबा ठेवा. तुमची प्रतिष्ठा टिकून ठेवा. जवळच नातलग, प्रवास सुखकारक होईल.

मकर : आजचे काम आजच नीटपणे पूर्ण करू शकाल. धंद्यात वाढ होईल. प्रेमाला चालना मिळेल.

कुंभ : दौर्‍यात यश मिळेल. सामाजिक कार्यात यश मिळेल. आर्थिक सहाय्य जमा करात येईल.

मीन : धंद्यात मोठा फायदा होईल. घर, जमीन खरेदी-व्रिकी करता येईल. स्पर्धेत प्रगती होईल.