मेष – पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल. धंद्यात धावपळ होईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाची इतरांवर छाप पाडाल. रागावर ताबा ठेवा.
वृषभ – कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल. आपल्या मानसिक चंचलतेला आवर घालावी. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात.
मिथुन – विरोधक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमची जिद्द महत्त्वाची ठरेल. कष्टाने कार्य पार पाडाल. मित्र भेटतील.
कर्क – नोकरीत अचानक कामात बदल होऊ शकतो. संयम बाळगावा. तुमच्यातील कार्यक्षमता दाखवून द्यावी. कलेचा आस्वाद घ्याल.
सिंह – गैरसमज दूर करू शकाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. अपयशाला घाबरून जाऊ नका. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.
कन्या – काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. गोड बोलून धंद्यात वाढ करता येईल. आत्मविश्वास वाढेल. थकबाकी वसूल कराल.
तूळ – नोकरीत वर्चस्व राहील. मित्राला मदत करावी लागेल. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
वृश्चिक – कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामात काही स्वरूपाचे बदल करावे लागतील. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.
धनु – मैत्रीतील गैरसमज दूर करावेत. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल. जनसंपर्क वाढेल. रागावर ताबा ठेवा.
मकर – बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराची प्रगती होईल. प्रवासात घाई करू नका.
कुंभ – उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मालमत्तेचे व्यवहार सावधपणे करावेत. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नवीन ओळख होईल.
मीन – आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाचा व्याप सांभाळावा लागेल. कामात आततायीपणा करून चालणार नाही.
Horoscope : बुधवार 20 नोव्हेंबर 2024
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -