राशीभविष्य : बुधवार २४ मे २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : किरकोळ कारणाने उदास होऊ नका. ओळखीतून मदत घेता येईल. जवळचे लोक आधार वाटतील.

वृषभ : कोर्ट कचेरीची कामे करता येतील. नोकरीत यश मिळेल. धंद्यात येणारी संधी घ्या.

मिथुन : रेंगाळत राहिलेले काम करून घ्या. धंद्यात नवे काम मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल.

कर्क : धंद्यात अंदाज बरोबर येईल. गुंतवणूक वाढवता येईल. घर घेण्याचा विचार कराल.

सिंह : मनाची द्विधा अवस्था होईल. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. काळजी घ्या.

कन्या : अडथळे आले तरी आजचे काम होईल. प्रयत्न करा. राग आवरा. धंदा मिळेल.

तुला : आप्तेष्ठांची भेट घडेल. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. खरेदी-व्रिकीत फायदा होईल.

वृश्चिक : पदाधिकारी मिळेल. जुने स्नेही भेटतील. धंद्याला कलाटणी मिळेल. वेळ कमी होईल.

धनु : वाहन जपून चालवा. किरकोळ दुखापत होईल. कोर्टाच्या कामात योग्य तेच बोला.

मकर : आजच्या कामात एखाद्या व्यक्तीची मदत घेता येईल. विरोध करताना गुप्त गोष्टींचा विचार करा.

कुंभ : विरोध मोडून काढता येईल. ओळखीच्या व्यक्तींची मदत घेता येईल. घरात क्षुल्लक तणाव होईल.

मीन : आजच्या कामात मार्ग शोधता येईल. रागाच्या भरात काम सोडू नका. जिद्द ठेवा.