राशीभविष्य : मंगलवार, ०६ एप्रिल २०२१

Horoscope
राशीभविष्य

मेष ः- जुने नवे कार्यकर्ते, सहकारी यांच्या बरोबर एकमताने चर्चा करता येईल. जीवनसाथी, मुले यांची साथ मिळेल.

वृषभ ः- नोकरीत काम वाढले तरी तुमचे काम चोख करून दाखवता येईल. वरिष्ठांच्या समोर नम्रतेने वागा.

मिथुन ः- तुमचा अधिकार तुम्हाला मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रगतीचा नवा मार्ग मिळेल.

कर्क ः- धंद्यात मोठे काम मिळवा. आर्थिक सहाय्य मिळवता येईल. कला क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह ः- तुमचा भाव वाढेल. वरिष्ठांच्या कडून शाबासकी मिळेल. मान-सन्मानाचा मिळण्याचा योग येईल.

कन्या ः- किरकोळ कारणावरून तुमचा अपमान होण्याची शक्यता आहे. घरातील व्यक्तींचा विचार करावा लागेल.

तूळ ः- नव्या विषयात रस वाटेल. कल्पना शक्तिला चालना मिळेल. साहित्य-कलेत प्रगतीची संधी मिळेल.

वृश्चिक ः- दर्जेदार व्यक्तींचा सहवास मिळेल. तुम्हाला नव्या विषयात रस वाटेल. दिशा मिळेल. धंदा वाढवा.

धनु ः- जीवनसाथी, मुले यांना खुष करता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. नवा विषय आवडेल.

मकर ः- स्वतःच्या वागण्यात सुधारणा करण्यासाठी स्वतःमधील कमी शोधावी लागते. त्यातच मोठेपणा मिळते.

कुंभ ः- जवळच्या लोकांच्या मनात असलेला विचार समजून घेता येईल. दुसर्यांच्या कामात मदत करावी लागेल.

मीन ः- अधिकाराचा वापर योग्य कामासाठी करा. भावना व व्यवहार यांची गल्लत व्यवहारात करू नका.