राशीभविष्य: बुधवार,०६ एप्रिल २०२२

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष :- महत्त्वाची गाठ-भेट आजच करून घ्या. खाण्याची चंगळ होईल. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल.

वृषभ :- जुना वाद काढू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.

मिथुन :- धंद्यात वाढ होईल. खर्चही वाढू शकतो. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका.

कर्क :- गुप्त कारवायांना ओळखा, म्हणजे योग्य उपाय नंतर करता येईल. अहंकाराने वागू नका.

सिंह :- तुमचा आत्मविश्वास वाढेल. घर घेण्याचा विचार पूर्णत्वास जाऊ शकेल. स्पर्धेत प्रगती होईल.

कन्या :- धंद्यात फायदा होईल. तुमचा विचार इतरांना पटल्याने समस्या लवकर सोडवता येईल.

तूळ :- जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. मोठी खरेदी कराल.

वृश्चिक :- मोठ्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कामात लक्ष द्या. चूक होईल. हिशोब नीट तपासून घ्या.

धनु :- आजचे काम व्यवस्थित पूर्ण करता येईल. शेजारी मदत करतील. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल.

मकर :- विरोध मोडून काढता येईल. गुप्त शत्रू मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. गुपित शोधून काढता येईल.

कुंभ :- तुमच्या धंद्यात चांगला जम बसेल. नवीन लोक येतील. विचारांना चालना मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.

मीन :- कामे वाढतील. फायदा मिळेल. संताप कमी करा. पदाधिकार मिळेल. वाहन जपून चालवा.