राशीभविष्य: बुधवार, २० एप्रिल २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- पैशाची गरज पूर्ण होईल. कामाच्या वेळेत इतरांची चौकशी करण्यात वेळ घालवू नका. महत्वाचा दिवस राहील.

वृषभ :- मनावरील दडपण दूर होईल. आळस केल्यास संधी हुकेल. तडजोड करण्याने फायदा होईल.

मिथुन :- स्पष्ट बोलणे दुसर्‍यांना त्रासदायक ठरेल. वाहन जपून चालवा. कोर्ट केसमध्ये दगदग व धावपळ होईल.

कर्क :- जुने संबंध सुधारतील. व्यवसायात सुधारणा करता येईल. पाहुण्यांचे स्वागत करावे लागेल.

सिंह :- काम करण्याचा उत्साह वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. जागेचा प्रश्न सुटेल.

कन्या :- मदत करण्याची संधी मिळेल. जुना वाद मिटवण्याची वेळ येईल. फायदा होईल.

तूळ :- थकवा आला तरी उत्साह टिकेल. मोठी खरेदी कराल. महत्त्वाचा निर्णय सावधपणे घ्या. वस्तू सांभाळा.

वृश्चिक :- जीवनाला मिळालेले वळण आनंद देणारे वाटेल. उत्साह वाढेल. काम करण्यास गती मिळेल.

धनु :- विरोध होईल. रागाने समस्या वाढेल. कायदा महत्वाचा असतो हे पहा.

मकर :- मुलांच्या सुखाने भारावून जाल. गुंतवणूक वाढेल. प्रवास संभवतो. नवीन संबंध जुळतील.

कुंभ :- क्षुल्लक तणाव संभवतो. काम करण्यासाठी नियोजन करण्याची गरज असते.

मीन :- नवा मार्ग मिळेल. खर्च वाढेल. मैत्रीचे बंध सुधारतील. प्रेमाची व्यक्ती मिळेल.