राशीभविष्य: बुधवार २२ फेब्रुवारी २०२३

horoscope
राशीभविष्य

मेष : आजच जास्त महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात फायदा होईल असा निर्णय घ्या. मान-प्रतिष्ठा मिळेल.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. निष्कारण पैसे खर्च होऊ देऊ नका. स्पर्धेत जिंकाल.

मिथुन : कठीण असलेले काम पूर्ण करता येईल. धंद्यात दादागिरी करून चालणार नाही. गोड बोला.

कर्क : प्रवासात दुखापत संभवते. गुप्त कारवायांचा त्रास वाढू शकतो. रागाच्या भरात हात उचलू नका.

सिंह : अपेक्षित कामे करून घेता येतील. चर्चा करता येईल. धंद्यात चांगली वाढ होईल.

कन्या : विरोधकांना आपलेसे करून घेणे सोपे नाही. सावधपणे कामे करा. मैत्रीत वाद करू नका.

तूळ : तुम्ही ठरविलेले काम पूर्ण करता येईल. संयमाने तुमचे मुद्दे लोकांसमोर मांडा तरच सुसह्य होईल.

वृश्चिक : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खाण्याची काळजी घ्या. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

धनु : धंद्यात चांगला जम बसवा. मागील येणे वसूल करा. स्पर्धेत कौतुक होईल.

मकर : फायदेशीर योजना धंद्यात समोरून येईल. कोर्ट केस जिंकता येईल. आर्थिक लाभ होईल.

कुंभ : राहून गेलेले काम पूर्ण करता येईल. वरिष्ठांना खूश करून स्वतःचे काम पूर्ण करता येईल. कोर्टाची कामे मार्गी लागतील.

मीन : धंद्यात तणाव होऊ शकतो. वादविवाद जास्त वाढवू नका. प्रवासात सावध रहा. कायदा मोडू नका.