Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१

राशीभविष्य : बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१

Related Story

- Advertisement -

मेष : मन चंचल होईल. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. धंद्यात काम वाढेल. अंदाज घेताना गोंधळ होईल.

वृषभ : महत्त्वाचे काम आज करून घ्या. वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. धंदा मिळवा.

- Advertisement -

मिथुन : कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंद्यात मोठे काम मिळवता येईल. वसुली करा.

कर्क : वृद्ध व्यक्तीच्या सेवेसाठी वेळ काढावा लागेल. जमिनीसंबंधी वाद मिटवणे सोपे नाही. चर्चा करता येईल. मारामारी करू नका.

- Advertisement -

सिंह : धावपळ होईल. तुमच्या विरोधात लोक जातील. तुम्ही विचारपूर्वक त्याला उत्तर देऊ शकाल. डोके स्थिर ठेवा.

कन्या : ठरविलेल्या कामात बदल करावा लागू शकतो. पोटाची काळजी घ्या. व्यसनावर निर्बंध घाला. वाहन जपून चालवा.

तूळ : कामाचा व्याप वाढेल. मन अस्थिर होईल. महत्त्वाची वस्तू जागेवर ठेवा. थकबाकी वसूल करा. संयमाने वागा.

वृश्चिक : मित्रांना मदत करावी लागेल. नवीन कामाचा आरंभ करण्याचे ठरवाल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या.

धनु : ओळखी वाढतील. वाहन, घर घेण्याचा विचार कराल. उत्साह वाढेल. दूरच्या प्रवासाचा विचार सर्वांना योग्य वाटेल.

मकर : राजकीय-सामाजिक कार्यात नव्या पद्धतीचे डाव टाकता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती कराल.

कुंभ : जुने स्नेही भेटतील. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घेता येईल. धंद्यात नवे तंत्र उपयोगात आणता येईल. केस संपवा.

मीन : योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांना दुखवू नका. दुसर्यांनी केलेल्या कामाला कमी लेखू नका.

- Advertisement -