राशीभविष्य: बुधवार २७ जुलै २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष : तुमच्या कार्यावर टीका होईल. वरिष्ठ नाराज होतील. प्रवासात वाद होऊ शकतो. मुले मदत करतील.

वृषभ : महत्त्वाचा निर्णय घेता येईल. वादाला महत्त्व देऊ नका. घरातील व्यक्तींना फसवू नका.

मिथुन : धंद्यात जम बसेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रसिद्धी मिळेल. प्रेमात यश येईल.

कर्क : ताण-तणाव कमी होईल. थकबाकी मिळवा. धंद्यात नवा बदल करता येईल. मित्र मिळतील.

सिंह : धावपळ होईल. डोळ्यांची काळजी घ्या. उष्णतेचा त्रास संभवतो. रस्त्याने नीट चाला.

कन्या : घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांची उन्नती होईल. घर खरेदीचा विचार कराल.

तूळ : मनावर दडपण येईल. क्षुल्लक वाद मनस्ताप देऊ शकतो. मन शांत ठेवा. स्थिर ठेवा.

वृश्चिक : विचारांना दिशा मिळेल. दुसर्‍याला कमी लेखू नका. नवा पर्याय धंद्यात मिळेल.

धनु : तुमच्या कार्याला सर्वांची मदत मिळेल. मैत्री वाढेल. स्पर्धेत प्रगती कराल. धंदा वाढेल.

मकर : जुना वाद मिटवून नव्या कामाकडे लक्ष द्या. धंद्यात वाढ करा. संधी कमी वेळासाठी असणे.

कुंभ : फायदा होणारी योजना समोरून येईल. प्रेमाची माणसे भेटतील. आवडते पदार्थ मिळतील.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. पाहुणे येतील. खर्च होईल. चांगला मार्ग शोधाल.