घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार, १० मार्च २०२१

राशीभविष्य : बुधवार, १० मार्च २०२१

Subscribe

मेष : घरातील कामे होतील. घर, वाहन घेण्याचा विचार कराल. धंद्यात मोठे काम मिळेल. महत्त्वाचा निर्णय आजच घ्या.

वृषभ : धंद्यात दुर्लक्ष करू नका. खर्च वाढण्याची शक्यता आहे. दुसर्‍याच्या कामासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च करावा लागेल.

- Advertisement -

मिथुन : आज ठरविलेले काम आजच करून घ्या. धंद्यात काम मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यातील चर्चा सफल होईल.

कर्क : किरकोळ अडचण काम करण्यात येऊ शकते. बोलताना काळजी घ्या. नातलग भेटतील. भेट वस्तू मिळेल.

- Advertisement -

सिंह : कोणताही महत्त्वाचा विचार आजच करा. धंद्यात वाढ होईल. वसुली करून घ्या. कला-क्रीडा स्पर्धेत प्रगती कराल.

कन्या : समस्या कमी होईल. जवळच्या माणसांसाठी धावपळ होईल. मुलांच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. खर्च होईल.

तूळ : नोकरीत महत्त्वाचे काम पूर्ण करा. वरिष्ठांच्या बरोबर कामाची चर्चा करता येईल. कला क्षेत्रात मन रमेल.

वृश्चिक : चिडचिडेपणा करू नका. तुम्हाला गोड बोलून काम करून घ्यावयाचे आहे. नवीन ओळख झालेल्याबरोबर व्यवहार नको.

धनु : काम रेंगाळत ठेऊ नका. उद्या अधिक वेळ लागेल. नवीन लोकांची ओळख होईल. विचारांना चालना मिळेल.

मकर : तुमच्या कार्याला गती देता येईल. किरकोळ कारणाने नाराज होऊ नका. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

कुंभ : जीवनसाथी, मुले यांच्याबरोबर मजेत वेळ घालवाल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवता येईल. स्पर्धेत पुढे जाल.

मीन : कठोर बोलण्यामुळे माणसे दुरावतात. धंद्यात हिशोब नीट करा. पाहुणे येतील. शेजारी कामासाठी येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -