मेष – कलाक्षेत्रात नावाजण्याची संधी मिळेल. प्रवास कराल. आपल्या कार्याचा प्रभाव जाणवेल. प्रकृतीची पथ्ये पाळा.
वृषभ – दुसर्यांची मने दुखावणार नाहीत याची दक्षता घ्या. आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवू शकाल. प्रयत्नांती यश मिळवाल.
मिथुन – अनेक क्षेत्रात आपण प्रगतिपथावर राहू शकाल. व्यापाराला चालना मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या.
कर्क – नोकरीत आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह – कार्यक्षेत्रात काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा.
कन्या – व्यावहारिक क्षेत्रात आगेकूच करणे सोपे जाईल. कलाक्षेत्रात चमकण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग येतील.
तुळ – नोकरीत काही चांगल्या घटनांची शक्यता राहील. आपल्या विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक – बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. कामकाजाचा व्याप वाढेल. प्रयत्नांनी अपेक्षित गोष्ट साध्य करणे शक्य होईल.
धनु – नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. प्रयत्नांना प्रतिसाद मिळेल.
मकर – नव्या क्षेत्रांचा परिचय होईल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कामकाजात प्रभाव राहील. आश्वासने देणे टाळा.
कुंभ – नोकरीत नव्या जबाबदार्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. उद्दिष्ट गाठू शकाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
मीन – व्यापारात लाभ संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल. स्पर्धा, साहसी कृत्ये टाळा. घरासंबंधीचे प्रश्न सोडवता येतील.
Horoscope : बुधवार 12 मार्च 2025
written By My Mahanagar Team
MUMBAI

संबंधित लेख