राशीभविष्य: बुधवार, ०४ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- घरातील वाद मिटवता येईल. क्षुल्लक वाद वाढवू नका. प्रवासात नवीन ओळख महत्त्वाची ठरेल.

वृषभ :- आज ठरविलेले काम विलंबाने होईल. धीर धरा. खाण्याची काळजी घ्या. वाटाघाटीत तणाव संभवतो.

मिथुन :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मोठ्या लोकांची ओळख होईल. मौज-मजेत वेळ जाईल.

कर्क :- प्रतिष्ठा पणाला लावून कोणताही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू नका. शांत डोक्याने विचार करा.

सिंह :- आजचे काम आजच करून घ्या. प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. वाटाघाटीत फायदा होईल.

कन्या :- कायद्याच्या कचाट्यात सापडू नका. नवीन ओळख झाल्याने उत्साह वाढेल. विचारांना दिशा मिळेल.

तूळ :- उत्साह व आत्मविश्वास वाढेल. पदाधिकार मिळेल. स्पर्धेत जिंकाल. मोठी खरेदी कराल.

वृश्चिक :- धंद्यात फायदा होईल. नातलगांची मदत उपयोगी पडेल. नम्रपणे प्रश्न सोडवा. अरेरावी नको.

धनु :- धंद्यात वाढ होईल. कामगारांना दुखवू नका. वाटाघाटीत यश मिळेल. डोळ्यांची काळजी घ्या.

मकर :- वरिष्ठांना दुखवू नका. अहंकाराने प्रतिष्ठा कमी होऊ शकते. श्रद्धा व सबुरी ही श्री साईंचे वचन आठवा.

कुंभ :- आजच्या कामात अडचणी कमी येतील. ओळखीचा उपयोग होईल. विरोध मोडून काढता येईल.

मीन :- तुमची जिद्दच यश देणारी ठरेल. कार्याला वेग प्राप्त होईल. धंद्यात फायदा होईल. स्पर्धा जिंकाल.