राशीभविष्य: बुधवार, ११ मे २०२२

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष :- तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून गैर अर्थ काढला जाईल. सामाजिक क्षेत्रात आरोप येईल. राग आवरा.

वृषभ :- मोठे काम करून घ्या. भेट यशस्वी होईल. धंद्यात फायदा होईल. थकबाकी वसूल करा.

मिथुन :- तुमचा प्रभाव वाढेल. प्रगतीची नवीन संधी तुमच्या कामात मिळेल. धंदा वाढेल.

कर्क :- स्पर्धेत अव्वल रहा. नवीन कल्पना कला क्षेत्रात सुचेल. प्रेमाला चालना मिळेल.

सिंह :- प्रवासात नवीन ओळख झालेल्या व्यक्तीशी जपून वागा. व्यवहारात फसगत होईल.

कन्या :- घरगुती तणाव कमी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. प्रेमात यश मिळेल.

तूळ :- कामाचा व्याप वाढेल. तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.

वृश्चिक :- आर्थिक व्यवहार आजच करा. ओळखीचा उपयोग करून घ्या. शेअर्सचा अंदाज घेता येईल.

धनु :- वरिष्ठांचा मर्जीच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. दगदग जास्त वाटेल.

मकर :- तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. लोकप्रियता मिळेला. घर, जमीन खरेदी-विक्रीत फायदा होईल.

कुंभ :- रेंगाळलेले काम करून घ्या. सहनशीलता ठेवल्यास कामात यश येईल. वाहन दुरुस्त कराल.

मीन :- महत्त्वाची कामे करून घ्या. वरिष्ठांची भेट घ्या. तुमची मागणी त्यांना सांगा.