राशीभविष्य : बुधवार,१२ मे २०२१

daily horoscope horoscope Tuesday 19 April 2022
daily horoscope horoscope Tuesday 19 April 2022

मेष ः- मुलांनी दिलेला सल्ला जास्त उपयोगी ठरेल. नवीन कामे मिळतील. ओळखीचा फायदा करून घ्याल.

वृषभ ः- रस्त्याने चालताना वेंधळेपणा करू नका. खिसापाकीट नीट सांभाळा. खर्च जास्त कराल.

मिथुन ः- संधीचा सदुपयोग करण्याची गरज असते. स्पर्धेत जिंकाल. मेहनत कमी पडणार नाही.

कर्क ः- धंद्यात मोठे काम मिळेल. प्रयत्न करा. मोठ्या लोकांच्या ओळखीने प्रभाव पडेल.

सिंह ः- मनावरील ताण कमी होईल. समाजकार्यात सहभागी व्हाल. लोकांच्या कामात मदत करावी लागेल.

कन्या ः- नातलगांच्या फोनमुळे मन अस्वस्थ होईल. खर्च अनाठाई करण्याची वेळ येईल. रस्त्याने सावध रहा.

तूळ ः- तुमच्या मनातील ठरलेली कामे करून घ्या. नातलगांची भेट घेता येईल. धंद्यात फायदा होईल.

वृश्चिक ः- गरज असलेला फोन येण्याची शक्यता आहे. वेळेला महत्त्व दिल्यास जास्त कामे होतील.

धनु ः- नव्या विचाराने प्रेरित व्हाल. लिखाण होईल. नवीन ओळखीचा फायदा करून घेता येईल.

मकर ः- विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवा. खाण्याची काळजी घ्या. प्रवासात अडचण येऊ शकते.

कुंभ ः- आजचे काम वेळेत पूर्ण करता येईल. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी तयारी कराल.

मीन ः- एखाद्या कामास थोडा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. कुणावरही जास्त भरवसा ठेऊ नका.