घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्यः बुधवार १० नोव्हेंबर २०२१

राशीभविष्यः बुधवार १० नोव्हेंबर २०२१

Subscribe

मेष :- तुमच्या मताशी सर्व लोक सहमत होतील. शत्रू तहाची भाषा बोलेल. वरिष्ठ तुमची बाजू घेतील. प्रेमात यश मिळेल.

वृषभ :- चांगल्या अनुभवाची अपेक्षा कराल. नोकरीत कामाची जबाबदारी पूर्ण करता येईल. अहंकाराला थारा देऊ नका.

- Advertisement -

मिथुन :- धीर धरावा लागेल. उतावळेपणाने काम बिघडण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी संपर्क ठेवा.

कर्क :- मनाची चंचलता वाढेल. गैरसमज तुमच्या अपरोक्ष तुमचीच जवळची व्यक्ती पसरविण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सिंह :- संयमाने तुमचे ध्येय तुम्ही गाठु शकाल. उत्साहावर नियंत्रण ठेवा. धंद्यातील चूक लक्षात येईल.

कन्या :- संतती बरोबर अचानक मतभेद होण्याची शक्यता आहे. मनस्ताप वाढेल. संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

तूळ :- तुमच्या कामात तत्परता येईल. प्रकृती सुधारेल. मैत्री वाढेल. खाण्यापिण्याची चंगळ होईल. पाहुणे येतील.

वृश्चिक :- विचारांचा गुंता करू नका. किरकोळ मतभेद वाढवू नका. सकाळी महत्वाचे काम करा.

धनु :- धंद्यात लाभ होईल. निर्णय योग्य असेल. चौकस बुद्धीचे कौतुक होईल.

मकर :- वर्चस्व वाढेल. प्रतिष्ठा वाढणारी घटना संभवते. धंद्यातील चुका लक्षात येतील.

कुंभ :- वड्याचे तेल वांग्यावर काढले जाईल. तुम्ही चिडाल. भावना अनावर होतील.

मीन :- नोकरवर्गाचा व्यवसायात तुटवडा जाणवेल. क्षुल्लक व्यक्तीला सुद्धा कमी लेखून चालत नाही. वाहन जपून चालवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -