Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : बुधवार 27 नोव्हेंबर 2024

Horoscope : बुधवार 27 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष – मानसिक चांचल्य जाणवेल. आवेगाला आवर घालावी लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. आपली मैत्री घट्ट होईल.
वृषभ – वरिष्ठांना खूश कराल. वादविवाद वाढवू नका. स्पर्धा जिंकाल. कष्टाला मागे पुढे पाहू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे.
मिथुन – आपल्या नावलौकिकात भर पडणारी घटना घडेल. प्रेमाच्या दृष्टीने चौकसपणा दाखवाल. मानापमानात अडकून पडू नका.
कर्क – नोकरीत तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल. आपल्या सहकार्‍यांशी जुळवून घ्यावे लागेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.
सिंह – काही अनपेक्षित बदल दिसून येतील. कामाचे योग्य नियोजन करावे लागेल. आत्मविश्वास वाढेल. नवीन ओळखी होतील.
कन्या – आपल्या मनमोकळ्या स्वभावाचे दर्शन घडवाल. मनातील नसती भीती दूर सारावी. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल.
तूळ – आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. विरोधकांच्या कारवाया वाढू शकतात. आपला दर्जा टिकवण्याचा प्रयत्न कराल.
वृश्चिक – वागण्या-बोलण्यात सज्जनपणा ठेवाल. गैरसमजातून वाद वाढू देऊ नका. कामात आपली छाप पाडण्यात यशस्वी व्हाल.
धनु – कार्यक्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. कामात वारंवार बदल करू नका. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
मकर – कौटुंबिक शांतता जपावी. तुमच्या संपर्कातील लोकांमध्ये भर पडेल. आपले मैत्रीचे संबंध जपाल. वाहन जपून चालवा.
कुंभ – घरातील लोकांच्या अपेक्षा आपणास पूर्ण करता येतील. विचारांना चालना मिळेल. धंद्यात क्षुल्लक अडचण येऊ शकते.
मीन – प्रेमाने बोलून समस्या सोडवाल. मित्र मंडळींशी सलोखा ठेवावा लागेल. खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -