मेष : महत्त्वाची गाठ-भेट आजच करून घ्या. खाण्याची चंगळ होईल. आप्तेष्ठांना मदत करावी लागेल.
वृषभ : जुना वाद काढू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.
मिथुन : धंद्यात वाढ होईल. खर्चही वाढू शकतो. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका.
कर्क : गुप्त कारवायांना ओळखा, म्हणजे योग्य उपाय नंतर करता येतील. अहंकाराने वागू नका. मारामारी करू नका.
सिंह : तुमचा आत्मविश्वास वाढेल. घर घेण्याचा विचार पूर्णत्वास जाऊ शकेल. स्पर्धेत प्रगती होईल.
कन्या : धंद्यात फायदा होईल. तुमचा विचार इतरांना पटल्याने समस्या लवकर सोडवता येईल.
तूळ : जिद्द ठेवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. मोठी खरेदी कराल.
वृश्चिक : मोठ्या लोकांची काळजी घ्यावी लागेल. कामात लक्ष द्या. चूक होईल. हिशोब नीट तपासून घ्या.
धनु : आजचे काम व्यवस्थित पूर्ण करता येईल. शेजारी मदत करतील. मनाप्रमाणे निर्णय घेता येईल.
मकर : विरोध मोडून काढता येईल. गुप्त शत्रू मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. गुपित शोधून काढता येईल.
कुंभ : तुमच्या धंद्यात चांगला जम बसेल. नवीन लोक येतील. विचारांना चालना मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.
मीन : कामे वाढतील. फायदा मिळेल. संताप कमी करा. पदाधिकार मिळेल. वाहन जपून चालवा. चूक होऊ शकते.