घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य बुधवार, २९ एप्रिल २०२०

राशीभविष्य बुधवार, २९ एप्रिल २०२०

Subscribe

मेष ः- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. धंद्यात वाढ होईल. मोठे काम मिळवण्याचा प्रयत्न करा. मैत्री वाढेल.

वृषभ ः- कुठेही बोलतांना योग्य तेच बोला. वरिष्ठ तुमची कामे करण्याचे आश्वासन देतील. धंदा वाढवणे कठीण वाटेल.

- Advertisement -

मिथुन ः- मोठ्या दिग्गज कला क्षेत्रातील लोकांची ओळख होईल. स्पर्धेत जिंकाल. उत्साह वाढेल.

कर्क ः- क्षुल्लक वाद वाढू शकतो. काळजी घ्या. शत्रू तयार होण्यास वेळ लागत नाही. खर्च जास्त होईल.

- Advertisement -

सिंह ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. नम्रता ठेवा. मैत्रीच्या भाषेतून बोलल्यास कामे पटापट होतील.

कन्या ः- आज रागावर ताबा ठेवा. अहंकाराने वागल्यास समोरची व्यक्ती तुमचा अपमान करण्याची शक्यता आहे.

तूळ ः- महत्त्वाचे काम करून घ्या. आळस करू नका. खर्चावर ताबा ठेवा. वरिष्ठ तुमच्यावर खुष होतील.

वृश्चिक ः- प्रसिद्धीचा आग्रह न धरता कोणतेही काम करत रहा. तुमच्यावर प्रेम करणार्‍या व्यक्तीला ओळखून ठेवा.

धनु ः- नविन ओळख होईल. धंद्यात मदत मिळू शकेल. स्पर्धेत जिंकाल. प्रेरणादाई दिवस राहिल.

मकर ः- तुमचे विचार पटवून देण्यात यशस्वी व्हाल. प्रेमाला चालना मिळेल. घर, वाहन, जमिन घेण्याचे ठरवाल.

कुंभ ः- तुम्ही ठरविलेल्या कामात प्रगती होईल. जुने स्नेही भेटल्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. चमचमीत जेवाल.

मीन ः- किरकोळ तणाव होऊ शकतो. भावनेच्या आहारी जाऊ नका. उत्साह वाढेल. वाहन जपून चालवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -