Maharashtra Assembly Election 2024
घरभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : मंगळवार 19 नोव्हेंबर 2024

Horoscope : मंगळवार 19 नोव्हेंबर 2024

Subscribe

मेष – घरगुती वातावरण चांगले राहील. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. राहून गेलेले काम करता येईल. व्यवसायात जम बसवा.
वृषभ – कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा. नवीन कामे आपल्या अंगावर पडतील. तुमच्यातील प्रेमळपणा सर्वांना दिसून येईल.
मिथुन – मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. शक्यतो कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ नका. अधिकाराचा योग्य वापर करावा.
कर्क – निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. कौटुंबिक वातावरणात रमून जाल. घरातील वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल.
सिंह – सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊन चालणार नाही. आपल्या कामातून समाधान शोधावे.
कन्या – नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. भागीदाराशी मतभेद वाढवू नका. आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ – आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो. धंद्यात दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक – अडथळ्यातून मार्ग काढता येईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. धंद्यातील समस्या कमी होईल. थकबाकी वसूल कराल.
धनु – तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. अतिसाहस करायला जाऊ नका. प्रेमाला चालना मिळेल. एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल.
मकर – ज्ञानाचा सदुपयोग करता येईल. मनातील शंका काढून टाकाव्यात. फटकळपणे बोलणे टाळा. आर्थिक व्यवहारात सावध राहा.
कुंभ – आपल्या धंद्यात वाढ होईल. मागील येणे वसूल कराल. नातेवाईकांशी क्षुल्लक मतभेद वाढू शकतात. नवीन कामात लक्ष घालावे.
मीन – घरातील लोकांची नाराजी दूर करता येईल. जिद्दीने यश खेचता येईल. मनाची द्विधा अवस्था टाळावी. नातेवाईकांना मदत कराल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -