मंगळ-राहूच्या युतीमुळे रक्षाबंधनापर्यंत ‘या’ ४ राशींनी राहा सांभाळून

मेष राशीमध्ये अंगारक योग १० ऑगस्टपर्यंत असेल शिवाय ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सुद्धा असणार आहे

ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहांला ग्रहांचे सेनापती मानले जाते. या राशिमध्ये राहू आधीपासूनच विराजमान होता. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे मेष राशीमध्ये अंगारक योग निर्माण झाला आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये या योगाला अशुभ समजले जाते. मेष राशीमध्ये अंगारक योग १० ऑगस्टपर्यंत असेल शिवाय ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सुद्धा असणार आहे. त्यामुळे ज्योतिषांच्या मते अंगारक योगामुळे रक्षाबंधनपर्यंत या ४ राशीच्या लोकांसाठी सांभाळून राहायला हवे.

या राशीच्या व्यक्तींनी राहा सावधान

 • मेष
  मंगळ आणि राहूच्या युतीमुळे मेष राशीमध्ये अंगारक योग तयार झाला आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी संभाळून राहायला हवे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. तसेच वाहन सांभाळून चालवायला हवे.
 • वृषभ
  १० ऑगस्टपर्यंत वृषभ राशीच्या व्यक्तींना दुर्घटना होण्याची शक्यता सांगितली जात आहे. पैशांच्या बाबतीत सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 • कर्क
  रक्षाबंधनपर्यंत कर्क राशीच्या व्यक्तींनी सतर्क राहायला हवं. तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. कुटुंबात कलह देखील निर्माण होऊ शकतो.
 • तूळ
  अंगारक योगामुळे तूळ राशींच्या व्यक्तींनी सावध राहायला हवे. तसेच आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायला हवे.

अंगारक योगापासून वाचण्यासाठी मंगळवारी भगवान हणुमानांची पूजा-आराधना करा.


हेही वाचा :Hindu Shastra : आज गुरूपुष्य योगात करा ‘या’ गोष्टींचे दान; मिळेल पुण्य आणि व्हाल धनवान