ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक काळानंतर राशी परिवर्तन होते. ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. येत्या 2 ऑक्टोबर रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र एका राशीत जवळपास 23 दिवस राहतो. शुक्राच्या या राशीपरिवर्तनाने 12 राशींपैकी 3 राशीच्या लोकांवर विशेष कृपा राहील.
‘या’ राशींवर शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा शुभ प्रभाव
- मेष
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. लांबचा प्रवास करावा लागेल.
- वृषभ
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे संक्रमण या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि सर्व जुन्या समस्या दूर होतील.
- सिंह
शुक्राच्या राशीपरिवर्तनाने या राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यवसायातून मोठा नफा मिळेल.