मेष ः- फायद्याच्या गोष्टी करता येतील. धंद्यात लाभ होईल. वाटाघाटीत चर्चा सफल करावी लागेल.
वृषभ ः- रेंगाळत पडलेले काम करता येईल. कोर्टकेसमध्ये चांगले यश मिळेल. केस संपवा.
मिथुन ः- खर्च अनाठाई होऊ शकतो. वेंधळेपणा केल्यास वस्तु हरवेल. सभ्य, संयमाने बोला.
कर्क ः- आज तुम्हाला कामात अडचणी कमी येतील. भेट घेता येईल. तुमचा विचार पटवून द्या.
सिंह ः- धंद्यात स्थिरतात आणता येईल. वाद मिटवा. नोकर माणसांचा प्रश्न सोडवता येईल.
कन्या ः- ताण-तणाव कमी होईल. थकबाकी वसूल करा. धंद्यात मोठे काम मिळेल.
तूळ ः- क्षुल्लक चुकीमुळे कामाचा व्याप वाढू शकतो. लक्ष द्या. खाण्याची काळजी घ्या.
वृश्चिक ः- तुमचा अंदाज बरोबर येईल. समोरच्या व्यक्तीच्या मनातील डाव ओळखता येईल. मैत्री जपून करा.
धनु ः- खाण्याची काळजी घ्या. शेजारी त्रस्त करतील. दुखापत संभवते. काम करताना काळजी घ्या.
मकर ः- तुमच्या कामात इतरांची मदत घेता येईल. मोठ्या व्यक्तीची भेट होईल. आज यश मिळेल.
कुंभ ः- छोट्या मुद्यावरून वाद होऊ शकतो. राग आवरा. मुलांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल.
मीन ः- कठीण वाटणारे काम करून घ्या. चर्चा यशस्वी होईल. पदाधिकाराची संधी मिळेल.