आजपासून ‘या’ राशींना चांगले दिवस, बुध ग्रहाची विशेष कृपा

ज्योतिष तज्ञांच्या मते, बुध ग्रह ऑगस्टमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. १ ऑगस्टपासून ते सिंह राशीमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी शुभ फळ देणारा सिद्ध होईल

ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व १२ राशींवर असेल. ज्योतिषांच्या मते, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याचा सरळ परिणाम सर्व राशींवर होतो. ज्योतिष तज्ञांच्या मते, बुध ग्रह ऑगस्टमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. १ ऑगस्टपासून ते सिंह राशीमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे ऑगस्ट महिना काही राशींसाठी शुभ फळ देणारा सिद्ध होईल. तर काही राशींसाठी अशुभ फळ देणारे असेल. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला बुद्धि, तर्क, संवाद, चातुर्य यां गुणांचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह मानला जातो.

बुध ग्रहाचे परिवर्तन या राशींसाठी असणार शुभ

 • सिंह
  बुध ग्रहाचे राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तिंच्या आई-वडीलांना आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदी असेल. नोकरी आणि व्यापारासाठी नवे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात आर्थिक परिस्थितीती सुधारेल.
 • कन्या
  ज्योतिषांच्या मते, कन्या राशीच्या व्यक्तिंसाठी बुधाचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होईल. या दरम्यान, तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. धार्मिक कामात यश प्राप्त होईल.वैवाहिक जीवन आनंदी असेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.
 • वृश्चिक
  ऑगस्टमध्ये होणाऱ्या बुधाच्या राशी परिवर्तनामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. मित्रांकडून मदत मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या स्वभावात बदल होईल.
 • मीन
  ज्योतिषांच्या मते, मीन राशीच्या व्यक्तिंना बुध ग्रहाच्या परिवर्तनामुळे अनेक लाभ प्राप्त होणार आहेत. परिक्षेत यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.आर्थिक लाभ होऊ शकतो.

हेही वाचा :मंगळ-राहूच्या युतीमुळे रक्षाबंधनापर्यंत ‘या’ ४ राशींनी राहा सांभाळून