राशीभविष्य: शनिवार ०४ जून २०२२

do you know todays horoscope find out horoscope future

मेष : पूर्वी घेतलेले श्रम आज फारच उपयोगी पडतील. मुलांच्या मनातील तणाव कमी होईल. धंदा वाढेल.

वृषभ : अपेक्षा वाढतील. नोकरीचा प्रश्न सुटेल. घरातील समस्या कमी होईल. स्पर्धा महत्त्वाची ठरेल.

मिथुन : कार्याला दिशा मिळेल. नव्या मित्रांच्या सहवासाने कामात उत्साह वाढेल. धंद्यात फायदा होईल.

कर्क : प्रकृतीकडे लक्ष द्या. धंद्यात थोडा खर्च जास्त होईल. कायदा मोडू नका. वाद वाढवू नका.

सिंह : धंद्यातील चूक काय झाली होती हे लक्षात येईल. कुणालाही कमी लेखू नका. मार्गदर्शन मिळेल.

कन्या : प्रवासात सावध रहा. महत्त्वाची वस्तू हटवण्याची शक्यता आहे. वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल.

तुला : दूरच्या प्रवासाचा विचार कराल. मान-प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. प्रेमाला चालना मिळेल.

वृश्चिक : किरकोळ अडचण येईल. स्पष्ट बोलणे करताना वयाचा विचार करा. सौम्य शब्द वापरा.

धनु : ताण-तणाव कमी होईल. नव्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे असे वाटेल. धंद्यात मार्ग मिळेल.

मकर : केलेले प्रयत्न यशस्वी झाले तरी, वरिष्ठांना दुखवू नका. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.

कुंभ : मनावरील दडपण कमी होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. कला-क्रीडा साहित्यात चमकाल.

मीन : प्रश्न वाढले तरी चिडचिड करू नका. मार्ग मिळेल. संयम ठेवा. मोठेपणाच्या आहारी जाऊ नका.