राशीभविष्य: सोमवार 11 एप्रिल 2022

Weekly Horoscope Future Sunday 12th June to Saturday 18th June 2022
राशीभविष्य

मेष ः- ठरविलेले काम पूर्ण कराल. तुमच्या विचारांना इतरांची सहमती मिळेल. धंदा वाढेल.

वृषभ ः- कोर्टाच्या कामात यश मिळेल. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. उत्साह वाढवणारी घटना घडेल.

मिथुन ः- डोळ्यांची काळजी घ्या. विरोधकांचा सामना करावा लागेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.

कर्क ः- वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाकडी वाट धरू नका. सहनशीलता ठेवा.

सिंह ः- रागाच्या भरात चांगले संबंध बिघडू शकतात. किरकोळ अडचण येईल. रस्त्याने सावधपणे चालावे.

कन्या ः- घरातील व्यक्तींसाठी स्वतःचे काम बाजूला ठेवाल. नवीन कामाचा प्रयत्न करता येईल.

तूळ ः- किरकोळ मतभेद घरात होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

वृश्चिक ः- आत्मविश्वासाने प्रश्न सोडवता येईल. ओळखीमुळे काम चांगल्या पद्धतीने करून घेता येईल.

धनु ः- धंद्यात प्रगती करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. वरिष्ठ खूश होतील.

मकर ः- विरोधकांचे मत ऐकून घ्यावे लागेल. हातघाईवर येऊ नका. वाहन हळू चालवा.

कुंभ ः- धंद्यात लक्ष द्या. नोकरवर्ग त्रस्त करण्याची शक्यता आहे. सामान्य अडचणींवर मात करावी लागेल.

मीन ः- पदाधिकार मिळेल. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. कोर्टाच्या कामात प्रतिष्ठा वाढेल.