राशीभविष्य: सोमवार २० फेब्रुवारी २०२३

rashi bhavisha

मेष : योजनांना कमी गती मिळेल. लोकांचे मन जिंकून घेता येईल. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी मागून घ्या.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. जिद्दीने कामे पूर्ण करा. प्रतिष्ठा मिळेल. प्रेमाने मत व्यक्त करा.

मिथुन : अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात घाई करू नका. कायदा हातात घेऊ नका.

कर्क : कुटुंबात प्रेमाने प्रश्न सोडवता येईल. महत्त्वाचा फोन आल्याने उत्साह वाढेल. यशस्वी दिवस.

सिंह : विरोधकांना गप्प करणे कठीण वाटेल. शेजारी त्रस्त करण्याची शक्यता आहे. मैत्री करावी लागेल.

कन्या : मुले सहाय्य करतील. प्रवासात नवीन परिचय होईल. जास्त विश्वास ठेवू नका. मान-सन्मान मिळेल.

तूळ : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. किरकोळ कारणावरून कामात बदल करण्याची वेळ येऊ शकते.

वृश्चिक : दौर्‍यात सावध रहा. तुमच्या प्रगतीने स्पर्धा करणारे लोक संभ्रमात पडतील. धंद्यात लक्ष द्या.

धनु : फायदेशीर योजनेकडे लक्ष द्या. क्षुल्लक कारणावरून मानहानी होऊ शकते. मदतीचा हात मिळेल.

मकर : नव्या दिशेने तुमची वाटचाल होईल. तुमची मैत्री इतरांच्या बरोबर झाल्याने मनातून शत्रूचे खच्चीकरण होईल.

कुंभ : मन उदास होईल. जुन्या आठवणी येतील. प्रतिष्ठेचा प्रश्न केल्यास मनाविरुद्ध घटना घडू शकते.

मीन : धंद्यात चांगला फायदा होईल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. वरिष्ठ तुम्हाला मदत करतील.