Homeभविष्यआजचे राशीभविष्यHoroscope : सोमवार 6 जानेवारी 2025

Horoscope : सोमवार 6 जानेवारी 2025

Subscribe

मेष – आर्थिक बाजू सावराल. खरेदीचे बेत साध्य होतील. घरासंबंधीचे प्रश्न सोडवता येतील. हट्टीपणाला मुरड घाला.
वृषभ – नको ती आश्वासने देण्याचे टाळावे. कलाक्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन मिळेल. सरकारी नियमांचे पालन करावे.
मिथुन – रागावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृतीचे पथ्ये पाळा. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. बाहेर जाण्याचे बेत आखाल.
कर्क – पुष्कळशा सकारात्मक गोष्टी साध्य करता येतील. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घेणे आवश्यक राहील.
सिंह – परिश्रमाने आपण यशाची वाट मिळवू शकाल. मनाची चंचलता वाढणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे.
कन्या – कामकाजात अधिक लक्ष दिल्यास लाभदायक ठरू शकते. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेणे योग्य राहील.
तुळ – आर्थिक व्यवसायात सावधानता बाळगा. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल.
वृश्चिक – बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींचे कौतुक होईल. मित्रमंडळीत रमाल. शांतपणे काम करण्याचे धोरण चांगले राहील.
धनु – सरकारी नियम व कायदा यांचे कटाक्षाने पालन करा. सामाजिक क्षेत्रात आपला सहभाग असेल. प्रकृती जपा.
मकर – आत्मविश्वास वाढून कामाला लागाल. प्रवासात सावधानता बाळगा. शक्यतो नको ते धाडस करू नका.
कुंभ – खर्चाचे प्रमाणे वाढेल. आपले आत्मपरीक्षण करणे लाभदायक होऊ शकेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग आहेत.
मीन – वैवाहिक जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -