राशीभविष्य: सोमवार १३ जून २०२२

मेष : महत्त्वाचे काम करून घ्या. जुने स्नेही भेटतील. धंद्यात फायदा होईल. नव्या विषयाकडे वळाल.

वृषभ : कोर्टाच्या कामात यश मिळेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. नोकरीचा प्रश्न सुटेल.

मिथुन ः कला-क्रीडा साहित्यात चमकाल. दिशा मिळेल. धंद्यात नवा फंडा शोधता येईल.

कर्क : क्षुल्लक कारणाने संताप करू नका. अडचण सोडवता येईल. वेळ फुकट जाण्याची शक्यता आहे.

सिंह : ठरविलेले काम करून घेता येईल. आळस करू नका. धंदा वाढेल. कठीण काम करा.

कन्या ः तुमचे प्रयत्नच तुम्हाला यश देऊ शकतात. विचारांची दिशा बदलाल. व्यसन करू नका.

तुला : उत्साहवर्धक घटना घडेल. कला-क्रीडा-साहित्यात प्रेरणादायी विचार सुचेल. प्रतिष्ठा मिळेल.

वृश्चिक : तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळेल. धंद्यात मोठे काम मिळेल. नवीन ओळख होईल. प्रवास सुखाचा होईल.

धनु : घरात आनंदाची घटना घडेल. धंद्यात फायदा होईल. मोठे काम मिळेल. नवीन पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर : तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपमानास्पद शब्द ऐकावा लागेल. कामात यश मिळेल.

कुंभ : मैत्रीतून चांगले काम मिळेल. धंदा वाढवा. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. तब्येत सांभाळा.

मीन : धाक दाखवून काम करून घेऊ नका. गैरसमज होईल. नेहमीप्रमाणे वागा. काम करा. यश मिळेल.